विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) पद्मविभूषण खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाभूळगाव येथे विद्यार्थ्यांना शालेय : साहित्याचे वाटप करण्यात आले. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सिल्लोड तालुका अध्यक्ष प्राध्यापक राहुल कुमार ताठे, बाभुळगाव चे माजी सरपंच राधाकिसन पाटील गोडसे, जिल्हा सरचिटणीस राहुल सुरडकर, युवक कार्याध्यक्ष दादाराव गोडसे, तालुका सदस्य द्वारकादास फरकाडे, प्रभाकर गोडसे, प्रभाकर पंत फरकाडे, सोशल मीडिया तालुकाध्यक्ष योगेश गोराडे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी शिक्षक मंडळी, विद्यार्थी पालक उपस्थित होते